29.6 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeमनोरंजन‘छावा’ पुढे ‘सिकंदर’ नतमस्तक

‘छावा’ पुढे ‘सिकंदर’ नतमस्तक

सलमान मोडू शकला नाही विकीचा रेकॉर्ड

मुंबई : सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट दोन वर्षांनंतर ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, सत्यराज, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास यांनी केले आहे. या चित्रपटाबाबत बरीच चर्चा झाली होती.

निर्माते, चित्रपट समीक्षक आणि इतर व्यापार विश्लेषकांनी दावा केला की चित्रपट पहिल्या दिवशी भारतात ४५-५० कोटी रुपये कमवेल, परंतु तसे झाले नाही. ‘सिकंदर’ या वर्षी रिलीज झालेल्या विकी कौशल-रश्मिका मंदानाच्या ‘छावा’च्या ओपनिंग डे कलेक्शनलाही मागे टाकू शकला नाही.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘सिकंदर’ने पहिल्या दिवशी २६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रविवारी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या चित्रपटाच्या ओपनिंग कलेक्शनने कोणताही विक्रम केलेला नाही. या सिनेमाने विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमापेक्षाही कमी कमाई केली आहे. छावाने पहिल्याच दिवशी ३१ कोटी रुपयांची कमाई केली होती.

इतकेच नाही तर सलमान खानच्या याआधीच्या चित्रपटांनी ओपनिंग डेच्या दिवशी यापेक्षा जास्त कलेक्शन करून ओपनिंग डे रेकॉर्ड तोडले होते. उदाहरणार्थ, २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘सुलतान’ने पहिल्या दिवशी ३६.५४ कोटींची कमाई केली होती. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या टायगर ३ ने पहिल्या दिवशी ५३.३ कोटी रुपयांची मोठी कमाई केली होती.

इंडस्ट्रीतील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ‘सिकंदर’ एक मोठे यश असेल आणि सलमान खानला ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकेल. विशेष म्हणजे बॉलीवूडमधील सर्वात विश्वासार्ह स्टारपैकी एक असलेला सलमान खान अद्याप ५०० कोटींचा चित्रपट देऊ शकलेला नाही. शाहरुख खानने ‘पठाण’ आणि ‘जवान’ व सनी देओलने ‘गदर २’मधून ही कामगिरी केली. गेल्या सात ते आठ वर्षांपासून सलमान सतत फ्लॉप सिनेमे देत असल्याचे म्हटले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR