24.5 C
Latur
Tuesday, July 22, 2025
Homeलातूरछावा संघटनेचे कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी तटकरेंना निवेदन; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन देणा-यांना मारहाण

छावा संघटनेचे कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी तटकरेंना निवेदन; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन देणा-यांना मारहाण

लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हीडीओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या पदाधिका-यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपताच त्यांना निवेदन दिले. माजी मंत्री संजय बनसोडे देखील तिथे उपस्थित होते. यावेळी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याच वेळी टेबलवर पत्ते देखील फेकण्यात आले. यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले.

सुनील तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. सभागृहात गेम खेळणा-या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना दिले. निवेदन देत असतानाच त्यांच्यासमोर पत्ते टाकण्यात आले. गेम खेळायचा असेल तर घरी खेळा… असे सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. सभागृह हे राज्यातील जनतेसाठी कायदा तयार करणारे सभागृह आहे. अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोकाटेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते बाहेर पडले. ज्या कार्यकर्त्याने निवेदन दिले त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे पाटील यांना तुफान मारहाण झालेली आहे. छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी हा वाद सोÞडवण्याचा प्रयत्न केला मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जोरदार मारहाण करण्यात आली.

विजयकुमार घाडगे पाटील काय म्हणाले?
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागण्यासाठी गेलो होतो. पत्ते खेळणारे कृषीमंत्री शेतक-यांचे काय भले करणार आहेत. याबाबत निवेदन दिले. त्यानंतर रेस्ट हाऊसच्या दुस-या खोलीत बसलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे गुंड लोकं आले, त्यांनी आमच्यावर हल्ला केला. सत्तेचा माज काय असतो हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाले. अजित दादा छावात शेतक-यांची पोरं आहेत, या गोष्टीचा हिशोब होणार असा इशारा विजयकुमार घाडगे पाटील यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR