21.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यात शह-काटशह!

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यात शह-काटशह!

शिंदे-फडणवीसातील अंतर वाढले? नाशिकवरूनही वाद वाढतोय

मुंबई : दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये भरणा-या कुंभमेळा आयोजनाची बैठक मुंबई येथे घेतली होती, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण असून देखील ते उपस्थित न राहता एकनाथ शिंदे यांनी मलंगगडच्या कार्यक्रमाला जाणे पसंत केले. नाशिक येथे होणा-या कुंभमेळाव्याला २ दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीचा आज एकनाथ शिंदे जाऊन आढावा घेतला. त्यामुळे आज देखील मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीकडे एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवत नाशिकमध्ये बैठक घेणे पसंत केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यातील दरी वाढतच असल्याचे दिसत आहे.

राज्यात महायुतीच सरकार सुरु आहे. महायुतीच्या सरकारने अनेक सोबतीने निर्णय घेतले आहेत. असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर वाढत आहे. सध्या दरी पडल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये भरणा-या कुंभमेळा आयोजनाची बैठक मुंबई येथे घेतली होती, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण असून देखील ते उपस्थित न राहता एकनाथ शिंदे यांनी मलंगगडच्या कार्यक्रमाला जाणे पसंत केले. नाशिक येथे होणा-या कुंभमेळाव्याला २ दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीचा आज एकनाथ शिंदे जाऊन आढावा घेतला आहे, त्यामुळे आज देखील मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीकडे एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवत नाशिक मध्ये बैठक घेणे पसंत केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यातील दरी वाढतच असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे, त्यामुळे महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद उघडपणे दिसत आहेत.

शिंदेंची बैठकांना दांडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बहुतांशी बैठकांना एकनाथ शिंदेंनी दांडी मारली आहे. स्वत:च्या विभागाच्या बैठकांनाही शिंदे गैरहजर असल्याने एकनाथ शिंदे हे फडणवीसांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस यांनी बोलावलेली १०० दिवसांच्या आढावा बैठकीला देखील शिंदे उपस्थित नव्हते. यामुळे पुन्हा एकदा शिंदे हे फडणवीसांवर प्रचंड नाराज असल्याची चर्चा केली जात आहे.

समातंर सत्ताकेंद्र चालणार
राज्याचे मुख्यमंत्री विविध प्रकल्पांचा आढावा वॉर रुमच्या माध्यमातून घेत असतात. त्यांच्या अध्यक्षतेखाळी संबंधित विभागांचे अधिकारी, मंत्री बैठकीला हजर राहून माहिती देत असतात. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याच धर्तीवर त्यांच्या पक्षाकडे असलेल्या खात्यांची स्वंतत्र बैठक घेण्यासाठी को-अॉर्डिनेशन रुमची निर्मिती केली आहे. ही वॉर रुम मुख्यमंत्र्यांच्याही वॉर रुमला शह देणारी असेल असे बोलले जात आहे. परिणामी समांतर सत्ताकेंद्र तयार होऊ शकते, असे सुद्धा सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे नगरविकास, म्हाडा, एमएसआरडीसी, एसआरए, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आहेत. या खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा को-ऑर्डिनेशन रुममधून एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR