18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले कामाख्या देवीचे दर्शन!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले कामाख्या देवीचे दर्शन!

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली जाणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. काल शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ९ मंत्र्यांचा आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे या विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी गुवाहाटीला दाखल झाले आहेत. शिंदे यांनी सहकुटुंब गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.

अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मोठे राजकीय भूकंप झाला होता. शिवसेनेत उभी फुट पडली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड पुकारत आपल्यासोबतच्या सर्व आमदारांना गुवाहाटीत नेले होते. तिथे काही दिवस प्रचंड अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडून आले होते.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत एकत्रित येऊन राज्यात सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीची पूजा केली होती. त्यावेळी, त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे आमदार देखील होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आता पुन्हा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR