16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवमुख्यमंत्र्यांकडून सावंत यांच्या चुकीबद्दल लाडक्या बहिणीची जाहीर क्षमा

मुख्यमंत्र्यांकडून सावंत यांच्या चुकीबद्दल लाडक्या बहिणीची जाहीर क्षमा

परंड्यात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी उन्हात, सावंताकडून खर्चाचे कारण पुढे

धाराशिव : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी (दि.८) धाराशिव जिल्ह्यात महायुतीच्या प्रचारात सभा झाल्या. एकाच दिवशी तीन सभा असल्यामुळे मुख्यमंर्त्यांनी घाई गडबडीत सभा आटोपल्या. त्यातच परंडा येथील सकाळीची सभा दुपारी दोन वाजता भर उन्हात झाली. यावेळी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांनी सभेसाठी मंडप न उभारल्यामुळे नाराजी व्यक्त करत भर उन्हात बसलेल्या लाडक्या बहिणीकडे बघत मी आपली माफी मागतो, असे जाहीर केले. केवळ तानाजी सावंत यांनी खर्चाच्या मर्यादा असल्याचे कारण सांगत मंडप टाकता आला नसल्याचे उत्तर दिले.

याउलट मात्र जिल्ह्यात इतर ठिकाणी झालेल्या सभेसाठी आलिशान मंडप उभारण्यात आले होते. मात्र परंडा येथे तानाजी सावंत यांना महिला उन्हात ठेवून खर्च वाचवणे कितीपत योग्य आहे, अशी चर्चा दिवसभर या मतदार संघात सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा म्हटले की एरवी सर्वत्र तानाजी सावंत यांच्या कार्यक्रमात आलिशान मंडप उभारण्यात येतो. मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री यांची सभा होणार असल्याचे माहित असताना त्यांनी आलेला नागरिकांना सावलीची सोय केली नाही.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री येण्यापूर्वी बराच वेळ आलेले हे नागरिक व महिला यांना मुख्यमंत्र्यांची वाट पहात उन्हात थांबावे लागले. दुपारी भर उन्हात दोन वाजता मुख्यमंत्री यांच्या सभेला सुरुवात झाली. सध्या कडक ऊन असल्यामुळे महिलांसह नागरिकांची घामाने घालमेल होत होती. यावेळी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू झाले यावेळी त्यांनी या कडक उन्हातील बसलेल्या महिलांकडे पाहत तानाजीराव माझ्या लाडक्या बहिणीसाठी मंडप का उभारला नाही, त्या उन्हात आहेत, असे म्हणत जाहीर सभेत उपस्थित लाडक्या बहिणींचे क्षमा मागितली.

केवळ तानाजी सावंत यांच्या चुकीमुळे खुद्द मुख्यमंत्र्यांना जाहीर सभेत माफी मागावी लागली. यामुळे सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना आचार संहिता व खर्चाचे कारण सांगितले. मात्र याच मुख्यमंत्र्यांच्या धाराशिव शहरातील सभेसाठी आलिशान मंडप उभारण्यात आला होता. मग त्यांना खर्चाचे व आचारसंहितेची अडचण नव्हती का? असा प्रश्नही विचारला जात आहे.

केवळ खर्चाची मर्यादा हे कारण सांगत सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरल्यासारखेच आहे. विशेष म्हणजे स्वत:हाच्या प्रचारार्थ सभेसाठी नागरिकांना बोलवून त्यांची गेरसोय करुन उन्हात बसवणे म्हणजे या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणे असाच प्रकार परंडा येथील सभेत दिसून आले. एरवी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा करणा-या सावंतांना हे कितपत योग्य वाटते असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR