मुंबई : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ््या झाडण्यात आल्या होत्या. यात सिद्दीकी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये तीन आरोपींचा समावेश होता. यापैकी दोघांना त्याच दिवशी अटक केली. मात्र, ज्याने सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला, तो मुख्य शूटर शिवकुमार गौतम गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला.
अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याला उत्तर प्रदेशच्या बहाराईच येथून अटक करण्यात आली. शिवकुमार गौतम सोबत आणखी इतर आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली. मुंबई पोलिस गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेश एसटीएफने ही संयुक्त कारवाई केली.