सोलापूर : युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित युनियन प्री प्रायमरी शाळेचे स्रेहसंमेलन अध्यक्ष नजीर अजीज शेख यांच्या अध्यक्षते खाली व केंद्रीय गुतचार विभागच्या अनुजा पाटीलं , सदर बजार पो स्टेशन च्या पीआय शिवांजली वट्टे , असि . मनमा असि . कमिशनर मनिषा मगर , उर्दू मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब नल्लामंदू सौ आएशा नजीर शेख, विस्तार अधिकारी दौलतबी शेख , नूर ट्रस्टचे अध्यक्ष नजीर मुन्शी , प्राचार्या नेहा शेख , यांच्या प्रमुख उपस्थित दीप प्रज्वलित करण्यात आले . संस्थेचे अध्यक्ष नजीर अजीज शेख , नर्गिस शेख यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले .
या नंतर विविध स्पर्धेत यश प्राप्त बालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल , प्रमाण पत्र देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी लहान चिमुकल्यांनी उर्दू , मराठी , इंग्रजी गीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून दाद मिळविले व रंगमंच गाजविले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जावीद काजी यांनी केले तर आभार नर्गिस शेख :यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्ताफ जकलेर , जावीद काजी , जावेद गढवाल , तंजीला चितापुरे , बुशरा जमादार , महेर अफरोज , अफशां इनामदार यांनी खूप परिश्रम घेतले .