22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयचीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा

चीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा

बीजिंग : चीनने जगातील सर्वात खोल आणि सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा तयार केल्याची माहिती समोर आली आहे. चिनी वैज्ञानिकांनी या प्रयोगशाळेत कामही सुरू केले आहे. चीनच्या दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतात २४०० मीटर खोल ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत नेमके काय सुरू आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. पण, दावा करण्यात येतोय की, या प्रयोगशाळेत अनेक रहस्ये उघड होणार आहेत.

विशेष म्हमजे, चीनची चंद्रावर नजर आहे. रशिया आणि चीनने चंद्रावर आपला बेस बांधण्याबाबत वक्तव्ये केली आहेत. अशा परिस्थितीत चीनला एवढी खोल लॅब बांधण्याची गरज का पडली आणि या भूमिगत प्रयोगशाळेत कोणते काम सुरू आहे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे डार्क मॅटर?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भूमिगत लॅबमध्ये अल्ट्रा लो रेडिएशन बॅकग्राउंडची सुविधा आहे. चिनी शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ब-याच काळापासून डार्क मॅटर एक रहस्य राहिले आहे. त्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. या नवीन प्रयोगशाळेमुळे डार्क मॅटरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होईल. या प्रयोगशाळेला जिनपिंग लॅब असे नाव देण्यात आले आहे. डार्क मॅटर असा पदार्थ आहे, ज्यात कोणतीही ऊर्जा किंवा प्रकाश नसतो. त्यामुळे हा शोधणे कठीण आहे. चिनी शास्त्रज्ञांना यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे शोधून इतिहास रचायचा आहे.

पृथ्वीच्या खोलात उत्तरे कशी मिळतील?
चीनमधील या भूमिगत प्रयोगशाळेच्या पहिल्या टप्प्याचे काम २०१० मध्ये पूर्ण झाले होते, परंतु आता ते पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आले आहे. अशा स्थितीत डार्क मॅटरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी एवढी खोल प्रयोगशाळा का खोदली गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे उत्तर चिनी शास्त्रज्ञांनीच दिले आहे. चिनी वृत्तसंस्थेला दिलेल्या उत्तरात प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, आपण जितक्या खोलवर जाऊ तितके कॉस्मिक किरण थांबवू शकू. त्यामुळेच ही लॅब डार्क मॅटर शोधण्यासाठी सर्वोत्तम मानली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR