28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयहरियाणात चीनी व्हायरसचा शिरकाव?

हरियाणात चीनी व्हायरसचा शिरकाव?

सिरसा येथील रुग्णालयात ११ मुले दाखल ५ जणांचा अहवाल निगेटिव्ह

सिरसा : हरियाणातील सिरसा येथे चिनी विषाणूने खळबळ उडवून दिली आहे. त्याचा त्रास होण्याची शक्यता असल्याने अकरा मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नंतर यापैकी ५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. हरियाणा आरोग्य विभाग सध्या अलर्ट मोडमध्ये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील मुलांमध्ये पसरणा-या नवीन विषाणूबाबत सिरसा येथील गंभीर आजारी मुलांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. फ्लूच्या संशयित दोन व्यक्तींचे नमुने आग्रोहा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इन्फ्लूएंझा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. त्याचवेळी पीआयसीयू वॉर्डमध्ये ११ मुले दाखल आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी १२ विशेष नर्सिंग कर्मचारी तैनात आहेत. सिरसाचे डेप्युटी सीएमओ डॉ बुधराम यांनी सांगितले की, खोकला आणि तापाच्या तक्रारीनंतर ११ मुलांना सिव्हिल हॉस्पिटलच्या पीआयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. ज्या मुलांना खोकला आणि ताप आहे, त्यांना चायनीज विषाणूचे संशयित रुग्ण मानून त्यांचे नमुने अग्रवाल मेडिकल कॉलेजमध्ये इन्फ्लूएंझा चाचणीसाठी पाठवले जात आहेत. अद्याप कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही.

चायनीज व्हायरसबाबत आरोग्य विभाग सतर्क
डॉ. बुधराम म्हणतात की, कोरोनाच्या काळात ताप असलेल्या प्रत्येक व्यक्तीला संभाव्य रुग्ण मानून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे चायनीज व्हायरसबाबत आरोग्य विभाग सतर्क असून प्रत्येक खोकला आणि तापाच्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी नमुने पाठवले जात आहेत. सिरसा जिल्ह्यात चिनी विषाणूशी संबंधित एकही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही. खोकला आणि तापाने त्रस्त असलेली ही मुले सिरसा येथील रहिवासी आहेत. अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.

४ चा अहवाल येणे बाकी
एपिडेमिओलॉजिस्ट डॉ.संजय कुमार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ९ फ्लू संशयितांचे नमुने इन्फ्लूएंझा तपासणीसाठी आग्रोहा येथे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५ मुलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ४ मुलांची तपासणी बाकी आहे. सध्या नवीन प्रकारासारखे कोणतेही प्रकरण नाही, परंतु विभाग सतर्क आहे.

केंद्राकडून राज्यांना सतर्कतेचे आवाहन
आरोग्य मंत्री २४ नोव्हेंबर रोजी आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की ते चीनमध्ये पसरत असलेल्या रहस्यमय आजारावर लक्ष ठेवून आहेत. आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते- चीनमधील मुलांमध्ये एच ९ एन २ प्रकरणे आणि श्वसन रोगांचा प्रसार बारकाईने निरीक्षण केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR