24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयकराची बंदरावर दिसल्या चिनी युद्धनौका आणि पाणबुड्या

कराची बंदरावर दिसल्या चिनी युद्धनौका आणि पाणबुड्या

नवी दिल्ली : पाकिस्तानी नौदल आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मीची (पीएलए) नौदल शाखा हे संयुक्त सराव करत आहेत. सी गार्डियन-३ हा दोन्ही नौदलाचा संयुक्त सराव शनिवारी कराची येथील पाकिस्तान नेव्ही डॉकयार्ड येथे सुरू झाला. वृत्तसंस्थेने या संयुक्त लष्करी सरावाच्या काही उच्च रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमांद्वारे माहिती गोळा केली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या अनेक आघाडीच्या युद्धनौका, एक पाणबुडी आणि डॉकयार्ड कराची बंदरावर दिसल्या आहेत.

हा सर्व अशा वेळी आयोजित करण्यात आला आहे जेंव्हा चीनने हिंदी महासागरात आपली सागरी उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढवली आहे. यामध्ये हॉर्न ऑफ आफ्रिकेतील जिबूतीमधील प्रमुख तळाचे बांधकाम आणि प्रादेशिक नौदलांना अनेक आधुनिक प्लॅटफॉर्मची विक्री यांचाही समावेश आहे.

अलीकडेच चीनने पाकिस्तानच्या नौदलाला ४ टाईप-०५४ ए/पी फ्रिगेट्सही दिले आहेत. किंग्स्टन नौदल तळाचे कमांडर रिअर अ‍ॅडमिरल लियांग यांग आणि पाकिस्तान फ्लीटचे कमांडर व्हाईस अ‍ॅडमिरल मुहम्मद फैसल अब्बासी हेही यावेळी उपस्थित होते. दोघांनीही या संयुक्त सरावाचे वर्णन नौदलांमधील घनिष्ठ आणि सामरिक संबंधांचे प्रतीक म्हणून केले आहे.

गेल्या वर्षी हिंद महासागरात पाळत ठेवणारी आणि सर्वेक्षण जहाजेही आढळून आली होती. ही चीनची जहाजे होती. या महिन्याच्या सुरुवातीला, एक चिनी संशोधन जहाज ‘शि यान’ ६ कोलंबोमध्ये थांबले आणि नंतर तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या किनारपट्टी दरम्यान उत्तरेकडे बंगालच्या उपसागरात गेले. असे मानले जात आहे की, चीन संपूर्ण प्रदेशात व्यापक पाणबुडी ऑपरेशन्स सक्षम करण्यासाठी बंगालच्या उपसागरासह हिंदी महासागरावर सक्रियपणे लक्ष ठेवत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR