नवी दिल्ली : भारतात दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथावर पथसंचलन केले जाते. या पथसंचलनात देशातील विविध राज्यांतील चित्ररथांचा सहभाग आढळून येतो.
परंतु, यंदाच्या प्रजासत्ताकदिनी दिल्ली, कर्नाटक, पंजाब आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथांची झलक पहायला मिळणार नाही. या सर्वांचे चित्ररथ यंदा रद्द करण्यात आले आहेत. मात्र, हे पहिल्यांदाच घडले आहे, असे अजिबात नाही. यापूर्वी देखील प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी काही राज्यांचे चित्ररथ रद्द करण्यात आले होते. यामागे अनेक कारणे आहेत. या संदर्भात पंजाब, कर्नाटक, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील नेत्यांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर संरक्षण मंत्रालयाने उत्तर देताना म्हटले आहे की, चित्ररथांसाठी जी खास थीम ठरवण्यात आली आहे. त्या थीमशी या राज्यांचे चित्ररथ जुळत नाहीत.
अशा परिस्थितीमध्ये प्रजासत्ताक दिनासाठी चित्ररथाची निवड कशी केली जाते? याची प्रक्रिया काय असते? आणि यासाठी किती टप्पे पार करावे लागतात? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आज या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.