27 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या बॅगेत सापडल्या चकल्या

अजित पवारांच्या बॅगेत सापडल्या चकल्या

बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली. बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी अजित पवारांच्या हॅलिकॉप्टरची तपासणी केली. अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेतील चकल्या हातात घेऊन खा-खा बाबा…सगळ्या बॅगा तपास…त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर…असे अजित पवार अधिका-यांना बोलताना दिसले.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला वेग येत आहे. राज्यातील प्रमुख नेते विविध जिल्ह्यांत जाऊन जाहीर सभा घेत आहेत. यादरम्यान राजकीय नेत्यांसोबत असणा-या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR