28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रहेलिकॉप्टरने गावाला प्रदक्षिणा

हेलिकॉप्टरने गावाला प्रदक्षिणा

सांगली : आपला भाऊ गावच्या उपसरपंचपदावर विराजमान झाला आणि आपल्या कुटुंबाचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून उपसरपंचांच्या छोट्या भावाने गावाला आणि गावातील राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालत आपला आनंद व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील भावावरचे हे बंधुप्रेम सध्या चर्चेत आहे.

दरम्यान, भावंडांमधील भांडणाच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या आहेत. संपत्तीच्या कारणावरून होणा-या वादाच्या कहाण्या महाराष्ट्रासाठी नव्या नाहीत. सांगलीतल्या आटपाडीमधल्या खिलारे बंधूंची कहाणी ही खूप आदर्शवादी आहे. अंकुश यांचे बंधू साहेबराव खिलारे हे गावाचे उपसरपंच झाले.

आपला मोठा भाऊ साहेबराव खिलारे याने गावातल्या राजकारणात घट्ट पाय रोवून उभे राहावे. त्याच्या कामाचा दबदबा पंचक्रोशीत असावा, अशी करगणी गावातील अंकुश खिलारे यांची मनोमन इच्छा होती. नुकतेच साहेबराव खिलारे हे करगणी गावचे उपसरपंच झाले. त्यानंतर मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून लहान भावाने गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या कळसाला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील खिलारे बंधूंप्रेमाची परिसरात प्रचंड चर्चा होत आहे.

अंकुश हे गलाई व्यावसायिक आहेत. त्यामुळे व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यात असतात. त्यामुळे गावातील शेती-कुटुंबाची जबाबदारी आपले ज्येष्ठ बंधू साहेबराव खिलारे यांच्यावर सोपविण्यात आलेली. मात्र भाऊ शेती सांभाळत आज गावचा उपसरपंच झाल्याचे सेलिब्रेशन मात्र या भावाने मोठ्या थाटामाटात केले. यामुळे सर्वच जण अचंबित झाले होते. गावावर तब्बल ३ ते ४ तास हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालण्यात आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR