22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेत नागरिकता कायदा झाला सोपा

अमेरिकेत नागरिकता कायदा झाला सोपा

अमेरिकेतील बायडन सरकारचा महत्त्वाचा निर्णय लाखो भारतीयांना मिळणार मोठा दिलासा

वॉशिंग्टन : अमेरिकत वर्षोनुवर्षे राहणा-या भारतीयांना ग्रीन कार्डसाठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. अमेरिकन सरकारने त्यांच्या इमिग्रेशन धोरणातंर्गत एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा अमेरिकेत राहणा-या भारतीयांना होणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात होणा-या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हा मुद्दा प्रचाराचा एक भाग होता. त्यामुळे ज्यो बायडन प्रशासनाने विना दस्तावेज अमेरिकेत राहणा-या लोकांना त्यांच्याकडे घर आणि नागरिकता देण्याचा निर्णय घेतला आहे. पॅरोल इन प्लेस पॉलिसी ऑफ इमिग्रेशन अंतर्गत ही सुविधा दिली जाईल. त्यामुळेच त्याला पॅरोल इन प्लेस ग्रीन कार्ड असे दुसरे नाव देण्यात आले आहे. ही योजना लागू झाल्यास अमेरिकेत राहणा-या भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. माहितीनुसार, अमेरिकन सरकारच्या या धोरणामुळे अमेरिकेत विना दस्तावेज राहणा-या कमीत कमी ५ लाखाहून अधिक भारतीयांना त्याचा फायदा होणार आहे.

पती असो वा पत्नी ज्यांच्याकडे अमेरिकेत राहण्यासाठी ग्रीन कार्ड अथवा दस्तावेज नाही, ज्यांनी अमेरिकन नागरिकाशी लग्न केले आहे अशा लोकांचा यात समावेश आहे. १७ जूनपर्यंत जे लोक अमेरिकेत १० वर्षाहून अधिक काळ राहत आहेत त्यांनाच याचा फायदा होईल. पॅरोल इन प्लेस धोरणानुसार, १० वर्षाहून अधिक काळ विना दस्तावेज अमेरिकेत राहणा-या लोकांना देशात कायदेशीर कामासाठी मंजुरी मिळेल. पात्र असणा-या लोकांना निवासासाठी अर्ज करायला ३ वर्षाची मुदत असेल आणि ते ३ वर्ष वर्क परमिटसाठी पात्र ठरतील.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय राहतात. त्यातील बहुतांश मतदार आहेत. निवडणुकीच्या प्रचारात ग्रीन कार्डचा मुद्दा चर्चेत आहे. त्यात भारतीय मतदारांना आकर्षिक करण्यासाठी अशाप्रकारची घोषणा करण्यात येऊ शकते. जर अमेरिकन सरकारने ही स्कीम लागू केली तर त्यात २१ वर्षाखालील किमान ५० हजार युवकांना याचा फायदा मिळू शकतो. ज्यांच्या आई वडिलांपैकी कुणीही एक अमेरिकन नागरिक असेल.

वेगळे राहणा-या पती-पत्नीला एकत्र आणणार
पॅरोल इन प्लेसमुळे भारतीयांना त्यांच्या कुटुंबासोबत राहता येणार आहे ज्यांचे पती किंवा पत्नी गैर अमेरिकन आहेत. विना दस्तावेजामुळे दिर्घ काळापासून पती-पत्नी वेगळे राहत होते. आता पॅरोल इन प्लेसमुळे पती-पत्नीला एकत्रित राहता येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR