मुंबई : काश्मीरच्या हत्याकांडाचेही आता राजकारण होईल. जसे ते पुलवामा हत्याकांडात झाले. हिंदूंच्या हत्या जेवढ्या होतील तेवढी मुसलमानांविरुद्ध आग ओकता येईल व अंधभक्तांना गृहयुद्धात ढकलता येईल असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, भारतात गृहयुद्ध सुरू झाल्याची बोंब भाजपमधील अनेक दुब्यांनी मारली आहे. हिंदू-मुसलमानांचे झगडे लावून रक्तपातास आमंत्रण देणारे हे लोक गृहयुद्धाचे ठेकेदार आहेत. काश्मीरातील हिंदूंचे हत्याकांड त्याच गृहयुद्धाचा भाग आहे. गृहयुद्ध जास्तच भडकले तर ‘राजा’आणि राष्ट्रप्रमुखाला पळून जावे लागते हे भाजपच्या दुब्यांना समजायला हवे.
संजय राऊत म्हणाले की काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात २६ पर्यटक प्राणास मुकले. हे बहुतेक पर्यटक हिंदू होते. मोदी व त्यांचे लोक देशात द्वेषाचे विष पेरत आहेत. त्यातून पहलगाम हत्याकांड घडले. कारण बंदूकधा-यांनी पुरुष पर्यटकांना गोळ्या घातल्यावर आक्रोश करणा-या महिलांना सांगितले, जाऊन सांगा तुमच्या मोदींना. याचा अर्थ काय? अर्थ सरळ आहे. धार्मिक गृहयुद्धाची ही ठिणगी पडताना दिसत आहे व हे गेल्या दहा वर्षांत राज्य करणा-या मोदी सरकारचे अपयश आहे.