22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयईपीएफओ खातेधारकांचा क्लेम आता अवघ्या चार दिवसांत निकाली निघणार

ईपीएफओ खातेधारकांचा क्लेम आता अवघ्या चार दिवसांत निकाली निघणार

नवी दिल्ली : निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या मदतीने दर महिन्याला काही रक्कम सेव्ह करतात. यालाच आपण पीएफ किंवा ईपीएफ म्हणतो. कर्मचा-यांनी गुंतवलेल्या या पैशांवर सरकार एफडीप्रमाणे व्याज देते. तसेच कर्मचा-यांनी गुंतवलेला हा पैसा बुडण्याची भीती नसते. तो सुरक्षित असतो. दरम्यान, जमा केलेल्या पीएफमधील काही निधी आपत्कालीन स्थितीत काढता येतो. याच आपत्कालीन निधी काढण्याच्या प्रक्रियेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे ईपीएफओ खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाअंतर्गत खातेधारकांनी केलेले वेगवेगळे क्लेम ऑटोमॅटिक प्रणालीने मार्गी लावले जाणार आहेत. ईपीएफओ खातेधारक शिक्षण, लग्न, घरखरेदी, घरबांधणी यासाठी पीएफ खात्यातील पैसे काढू शकतात. त्यासाठी खातेधारकाला क्लेम करावा लागतो. याच क्लेमची संपूर्ण प्रक्रिया आता ऑटोमॅटिक झाली आहे. याबाबत कामगार मंत्रालयाने सविस्तर सांगितले आहे. कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार ईपीएफ योजना, १९५२ च्या कलम ६८ (शिक्षण आणि विवाह) तसेच ६८ बी (घरासाठी अ‍ॅडव्हानस पैसे) अंतर्गत करण्यात आलेले सर्व दावे ऑटो क्लेम सेटलमेंट फॅसिलिटीच्या मदतीने निकाली काढले जाणार आहेत.

तीन दिवसांत क्लेम निकाली निघणार
याआधी कर्मचा-याने केलेला क्लेम निकाली काढण्यासाठी कमीत कमी दहा दिवस लागायचे. आता मात्र ऑटो क्लेम सेटलमेंट फॅसिलिटीमुळे अवघ्या तीन ते चार दिवसांत हे क्लेम निकाली काढण्यात येतील. तीन ते चार दिवसांतच खातेधारकांचा क्लेन पूर्ण होईल आणि त्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील रक्कम मिळेल. विशेष म्हणजे असे क्लेम निकाली काढताना कोणत्याही मानवाचा हस्तक्षेप होणार नाही.

एप्रिल २०२० मध्ये चालू केली होती सुविधा
केंद्र सरकारने अशीच सुविधा करोना महोसाथीच्या काळात एप्रिल २०२० मध्ये चालू केली होती. तेव्हा आजारासंदर्भातील क्लेम लवकरात लवकर निकाली निघावेत आणि लोकांना उपचारासाठी पैशांची चणचण भासू नये म्हणून अशी सुविधा चालू करण्यात आली होती.

अ‍ॅडव्हान्स क्लेमची सीमा एक लाख रुपये
ईपीएफओने लोकांना दिलासा देणारा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आजाराच्या संदर्भात केलेल्या अ‍ॅडवान्स क्लेमची सीमा ही १,००००० रुपये करण्यात आली होती. अगोदर ही सीमा फक्त ५०,००० रुपये होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR