22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयनिवडणुका संपेपर्यंत काँग्रेसवर करासाठी जबरदस्ती करणार नाही

निवडणुका संपेपर्यंत काँग्रेसवर करासाठी जबरदस्ती करणार नाही

आयकर विभागाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर आयकर विभागाने काँग्रेसला दोन नोटीस पाठवल्या आहेत. आयकर विभागाकडून तब्बल ३,५६७ कोटींची कर थकबाकी भरण्यासाठी नोटिस आल्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी निवडणुकास संपेपर्यंत करासाठी काँग्रेसवर कोणतीही जबरदस्ती करण्यात येणार नाही, असे आयकर विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ जुलै रोजी होणार आहे.

आयकर विभागाकडून ३,५६७ कोटींची कर थकबाकी भरण्याची मागणी करणा-या नोटिसा मिळाल्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, लोकसभा निवडणुका संपेपर्यंत विरोधी पक्षाच्या विरोधात कोणतीही जबरदस्ती कारवाई करणार नाही.

तसेच फक्त निवडणुकीपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. त्यानंतर याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, निवडणुका सुरू असल्याने कोणत्याही पक्षाला कोणतीही अडचण येऊ नये अशी विभागाची इच्छा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR