18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeधाराशिवपारधी समाजाच्या दोन गटांत हाणामारी; ४ ठार

पारधी समाजाच्या दोन गटांत हाणामारी; ४ ठार

धाराशिव : प्रतिनिधी
राज्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून दिवसाढवळ्या हत्या, जीव जाईपर्यंत मारहाण, लैंगिक अत्याचार, बंदुकीचा धाक दाखवत दहशत, अपहरण अशा अनेक घटनांचे मराठवाडा केंद्रस्थान बनला आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पारधी समाजाच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत चौघांचा मृत्यू झाला आहे.

शेतात पाणी देण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली असून जीव जाईपर्यंत मारल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून यात ३ पुरुष आणि एका महिलेचा सहभाग आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून १० आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धाराशिवमधील वाशी तालुक्यातील बावी पेढीवरील ही घटना असून मध्यरात्री शेतात पाणी देण्याच्या वादातून दोन्ही गटांत प्रचंड मारहाण झाली. या हाणामारीत जीव जाईपर्यंत एकमेकांना मारल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयितांना ताब्यात घेतले आहे.

येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या घटनेनंतर धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून येरमाळा पोलिसांनी दहा आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असून वाशी तालुक्यातील बावी वस्तीतील या घटनेने तणावाचे वातावरण होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR