28.8 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रविरारमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या

विरारमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या

पालघर : प्रतिनिधी
बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या प्रकरणी विरारमधील प्राचार्य आणि शिक्षकांवर बोळींज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तरपत्रिका घरी नेण्याची परवानगी नसतानाही बेकायदेशीररित्या या उत्तरपत्रिका घरी नेण्यात आल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला. बारावी कॉमर्सच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या १७५ उत्तरपत्रिका जळाल्या होत्या.

विरारमध्ये १२ वी कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली. विरारच्या नानाभात या परिसरात राहणा-या प्रिया रोड्रिंक्स या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली. उत्तरपत्रिका जळाल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत बोळींज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जळालेल्या उत्तरपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.

१७५ उत्तरपत्रिका जळाल्या
बारावी कॉमर्सच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या एकूण ३०० उत्तरपत्रिका शिक्षिकेने तपासणीसाठी घरी नेल्या होत्या. घरात अचानक आग लागली आणि या आगीत संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खाक झाला. त्यामध्ये १७५ उत्तरपत्रिका जळाल्या. ही घटना १० मार्च रोजी विरार पश्चिमेच्या बोळींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR