नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणा-या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.
मराठीसह अन्य पाच भाषांना अभिजात दर्जा दिला आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आतापर्यंत आपल्याकडे तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या अधिसूचित अभिजात भाषा होत्या. अभिजात भाषांचे संवर्धन आणि संवर्धन करण्यासाठी आणि समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे. पंतप्रधान मोदींनी नेहमीच भारतीय भाषांवर लक्ष केंद्रित केले आहे. आज मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या ५ भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.