24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरवातावरणातील बदलाचा द्राक्षबागांना फटका

वातावरणातील बदलाचा द्राक्षबागांना फटका

सोलापूर : वातावरण बदलाने अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, पहाटे पडणारे धुके यामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसत आहे. औषध फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत, गतवर्षी अतिरिक्त उत्पादनाने द्राक्ष उत्पादकांना भाव मिळाला नाही. बेदाण्याचा दरही पडल्याने द्राक्ष बागायतदार आर्थिक संकटात असतानाच यंदा पुन्हा वातावरणातील बदलामुळे नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात जवळपास ५००० हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. यामध्ये प्रामुख्याने निंबर्गी, बोरामणी, कुसूर, खानापूर, बाळगी, हत्तूर या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा आहेत.

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. परिणामी पन्नास टक्के द्राक्ष उत्पादन घटणार आहे. सध्या अवकाळी पाऊस थांबला असला तरी ढगाळ हवामान, पहाटे पडणारे धुके,वाढलेली थंडी यामुळे द्राक्षबागांवर भुरी, दावण्या अशा बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरीबांधवांना बागेवर वारंवार बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे.

त्यामुळे यंदाही उत्पादन घटून द्राक्ष उत्पादकांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. द्राक्ष उत्पादकांबरोबरच या वातावरणातील बदलाचा फटका कांदा पिकालाही बसत आहे, काढून टाकलेल्या कांदा या वातावरणामुळे काळा पडत आहे, नासत आहे. अवकाळी पावसाने भिजलेल्या कांद्याला भाव मिळत नाही. मात्र हे वातावरण ज्वारी, गहू, हरभरा पिकास पोषक मानले जात आहे. या बातावरणाचा तूर पिकासदेखील फटका बसणार आहे. पाऊस अत्यल्प झाल्याने तुरीचे उत्पादन घटले आहे.

अवकाळी पावसामुळे फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बातावरणातील बदलामुळे आवश्यक त्या कीटकनाशकांची फवारणी करून बागेची काळजी घ्यावी.असे दक्षीण सोलापूर तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांनी सांगीतले.

ढगाळ हवामान, पहाटे पडणान्या धुक्यामुळे बागेवर बुरशीजन्य रोग पडत आहेत. त्यामुळे बुरशीनाशक फवारणी करावी लागत आहे. परिणामी उत्पादन खर्च वाढत आहे. या वातावरणाचा द्राक्ष उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अवकाळी पावसामुळे फुलो-यात असणाऱ्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR