28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडतामसा येथील मटका बंद करा

तामसा येथील मटका बंद करा

छावा संघटनेचे पोलीसांना निवेदन

हदगाव:- प्रतिनीधी
तालुक्यातील तामसा गावात खुले आम् जोरात कल्याण मुंबई नावाचा जुगार चालू असून या ठिकाणी चालू असलेला मटका त्वरित बंद करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन तामसा पोलीसांना देण्यात आले आहे.

तामसा ही बाजार पेठ मोठी असून या गावात खुले आम् कल्याण मुंबई नावाचा जुगार चालू असून या ठिकाणी परिसरातील सुमारें ४० गावातील नागरिक यांची ये जा असते.
या ठिकाणी हंगाम असून शेतक-याची तरुण मुले,शेतकरी,हमाल,कामगार,शेतमजूर, बेरोजगार मुले श्रीमंत होण्याच्या नादात कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आहेत. तेव्हा या मद्ये बरेच तरुण बरबाद झाले आहेत.

या ठिकाणी परिसरातील तरुण बरबाद होत असल्या मुळे सामाजिक आक्रमक संघटना छावा संघटनेचे च्या वतीने तामसा येथील मटका चालू असलेला त्वरित बंद करावा अश्या मागणीचे निवेदन तामसा पोलिसांना दिले आहे .
या वेळी छावा संघटनेचे दिनेश पवार,मारोतराव पाटील, आत्माराव पवार,पवन पवार,अभ्य कदम,ऋषिकेश पवार,दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR