22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeपरभणीपरभणीच्या मानोलीत ढगफुटी; महिला वाहून गेली

परभणीच्या मानोलीत ढगफुटी; महिला वाहून गेली

मानवत : मानवत तालुक्यातील मानोली शिवारात सोमवार, दि. १० रोजी दुपारी ४च्या सुमारास ढगफुटी झाली. यामुळे आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्या होत्या. यातील रंजना सुरवसे ही महिला झाडाचा सहारा मिळाल्याने वाचली तर दुसरी महिला सुनिता धुरपती लव्हाळे (वय ४०) या मात्र सापडल्या नव्हत्या.

मानोली येथील महिला शेतात सरकी लावण्यास गेल्या होत्या. या महिला परत घरी येत असताना मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे गावा जवळील ओढ्याला पूर आला. या ओढ्यातून जात असताना पाण्याचा वेग खूप जास्त असल्याने सुनीता लव्हाळे, रंजना सुरवसे या दोन महिला वाहून जात होत्या. यातील रंजना सुरवसे ही महिला झाडाचा सहारा मिळाल्याने बचावली तर सुनीता लव्हाळे ही महिला वाहून गेली. रात्री ८ पर्यंत शोध सुरु होता परंतू महिला सापडली नव्हती. या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये तहसिलदार, मंडळ अधिकारी व गावकरी दाखल झाले असून महिलेचा शोध घेत आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR