27.6 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रयोगायोगाने गाजला अधिवेशनाचा पहिला दिवस

योगायोगाने गाजला अधिवेशनाचा पहिला दिवस

मुंबई (प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीतील आरोप – प्रत्यारोपांमुळे गढूळलेले राजकारण आज योगायोगाने घडलेल्या घटनांनी काहीसे निवळले. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो एक लिफ्टमुळे. विधानभवनाच्या लिफ्टमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले. दोघेही मिळून वरच्या मजल्यावर गेले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आले. दोघेही एकमेकांशी सौहार्दाने बोलताना दिसून आल्याने वेगवेगळया चर्चा सुरू झाल्या. याबाबत विचारता उद्धव ठाकरे यांनी मिश्किल कोटी करून वावड्यांना विराम दिला.

अनेकांना वाटलं असेल ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे. पण ती योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती. लिफ्टच्या भिंतींना कान नसतात त्यामुळे पुढील गुप्त चर्चा लिफ्टमध्येच करूह्व, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर मार्मिक प्रतिक्रिया दिली. ह्लत्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यावर म्हणजे मुख्यमंत्रयांचे मंत्रालयातील दालन ज्या मजल्यावर आहे तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. दोन वर्षांपुर्वी ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये शिफ्ट झाल्याने आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो, असा टोला त्यांनी लगावला.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लिफ्टचा विषय गाजला. विधानभवनाच्या लिफ्टमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले. उद्धव ठाकरे हे विधान भवनाच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट जवळ उभे होते. त्याचवेळी तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला. दोघे तिथे एकमेकांशी बोलले त्यानंतर दोन्ही नेते लिफ्टमध्ये शिरले. त्यांच्यासोबत मिंिलद नार्वेकरही होते. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याचं सांगितलं जातं. या लिफ्टमधील भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. राज्यात गेल्या काही वर्षांत ज्या वेगवान राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर तसेच आताच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर या दोन्ही नेत्यांच्या या भेटीने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र मागच्या काही कालावधीत सोडले होते. त्यामुळे आजच्या चित्राचे आश्चर्य वाटले नसते तरच नवल.

नंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा या भेटीबद्दल विचारले गेले. तेव्हा ते म्हणाले, ह्ल आम्ही लिफ्टमध्ये एकत्र होतो. अनेकांना वाटलं असेल ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठेङ्घ ती योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आमच्यात काही चर्चा नाही. भिंतीला कान असतात पण लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे आमच्या पुढील गुप्त बैठका, चर्चा आम्ही लिफ्टमध्ये करू अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यावर पोहोचू शकत नाही. दोन वर्षांपुर्वी ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये शिफ्ट झाल्याने आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो आहोत. राज्यातील जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लिफ्टनंतर चंद्रकांतदांदांनी दिले चॉकलेट !
भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधानभवनातच भेट झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि दानवे यांना चॉकलेट दिलं. चंद्रकांत पाटील स्वत:हून उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्याने आणि चॉकलेट दिल्याने पहिल्या दिवशी तो देखील चर्चेचा विषय बनला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR