21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरपिकांचे पंचनामे पाच दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

पिकांचे पंचनामे पाच दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

सोलापूर : वादळी वाऱ्यासह मे मध्ये सोलापुरात जोरदार पाऊस झाला असून यामुळे ४ हजार ९७७ पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. बाधित शेतीचे पंचनामे पुढील पाच दिवसात पूर्ण करून अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कृषी विभागाला केली आहे.

१ ते २७ मे दरम्यान सोलापुरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. काही भागांत गाराही कोसळल्या. १२ ते २७ मे दरम्यान जिल्ह्यात एकूण ४ हजार ९७७ हेक्टरपीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यातू ४ हजार ३१३ शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच १८६२ घरांची पडझड झाली आहे. एकूण ४१ जनाव दगावली आहेत. वीज पडून एकूण १० नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत सर्वाधिक करमाळ्यात ७ जणांचा मृत झाला आहे. मोहोळमध्ये दोघांचा, त पंढरपुरात एकाचा मृत्यू झाला आहे सर्वाधिक नुकसान पंढरपूरमध्ये १८८ हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

येथे २३९७ शेतकरी बाधित झाल असून ५३९ घरांची पडझड झाली आहे. २६ मे रोजी सोलापुरात जोरदार पाऊस झाला. यामुळे एका दिवसात १११४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यातून १६७९ शेतकरी बाधित झाले असून, याचा कृषी विभागाने प्राथमिक नजर अंदाज महसूल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. १२ ते २७ मे दरम्यान झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात ४ हजार ९७७ पीक क्षेत्राचे नुकसान झाले असून सर्व नुकसानीत पीक क्षेत्राचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR