22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूररिक्षा व कारच्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा मृृृृत्यू

रिक्षा व कारच्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा मृृृृत्यू

सोलापूर : रिक्षाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (ता. २३) सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात घडला. भाग्यश्री निवृत्ती कांबळे (वय १७) ही अकरावीतील विद्यार्थीनी अपघातात ठार झाली आहे.

कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षाला (एमएच १३, सीटी ९४७९) सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी (वय १९) ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

त्याचबरोबर या अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले (वय १४) हा आठवी शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण आहे. भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे कोंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR