सोलापूर : शोतोकॉन मार्शल आर्ट कराटेकिंक बॉंिक्सग अकॅडमी व कराटे फेड्रेशन ऑफ शोतोकॉन इंडीया या संस्थेमार्फत कलर बेल्ट परीक्षा कै.रखमाबाई हत्तूरे मंगलकार्यालय येथे घेण्यात आली. ही परीक्षा सोलापूर जिल्हा टेक्निकल डायरेक्टर सेन्साई राजेंद्र हक्के, ब्लॅक बेल्ट ४ दान याच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रमाणपत्र वितरणसाठी प्रमुख पाहूणे म्हणून विरेश हत्तूरे, भाजपा सरचिटणीस ता. द. सोलापूर मल्लिनाथ चिवडशेट्टी, होटगी स्टेशनचे तंटामुक्त अध्यक्ष सुरेश डवले, वळसंगचे ग्रामपंचायत सदस्यअनिल बर्वे, सामाजिक कार्यकर्ते दिपक टोणपे, माऊली महाविद्यालय वडाळा कॉलेजचे प्राध्यापक दत्ता हरवाळकर सर , या मान्यवरानी विध्यार्थीना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी बाळे शाखेचे प्रशिक्षक युराज सुंटनुर, भागेश धुमघोडा, चंद्रकांत तवटे, मयुर फुलारी, समर्थ सुतार, धनलक्ष्मी बिराजदार, तेजश्री फुलारी या ब्लॅक बेल्ट विध्यार्थीनी परीश्रम घेतले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक मोरे यांनी केले तर आभार दत्ता हरवाळकर यांनी केले.