39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआ. गणपत गायकवाड यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’

आ. गणपत गायकवाड यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’

कल्याण : उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे.

तर दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभाताई गायकवाड यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण
शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या चिंचपाडा परिसरातील जनसंपर्क कार्यालयाबाहेर विकास कामाचे भूमिपूजन करत सुलभाताई गायकवाड यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड यांचे जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR