28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनये रे ये रे पैसा ३ येतोय!

ये रे ये रे पैसा ३ येतोय!

मुंबई : दिग्दर्शक संजय जाधव यांच्या आगामी ये रे ये रे पैसा ३ या चित्रपटात आणखी काही नव्या कलाकारांची वर्णी लागली आहे. ये रे ये रे पैसा ३ या चित्रपटाचा मुहूर्त आज सकाळी मुंबईत पार पडला. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आदींच्याही भूमिका आहे.

ये रे ये रे पैसा आणि ये रे ये रे पैसा २ या चित्रपटांनी यापूर्वी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले होते. पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या कथासूत्रावर हे चित्रपट बेतलेले होते. आता आधीच्या दोन चित्रपटातले कथानक आणि त्या धमाल व्यक्तिरेखा आता तिस-या भागात काय धमाल करणार याची उत्सुकता चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच निर्माण झाली आहे. ये रे ये रे पैसा ३ मध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रेतील अभिनेत्री वनिता खरातचीदेखील वर्णी लागली आहे. छोट्या पडद्यावर आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी वनिता आता ये रे ये रे पैसा ३ धमाल करण्यास सज्ज झाली आहे.

ये रे ये रे पैसा ३ या मल्टिस्टारर चित्रपटात आता अभिनेत्री वनिता खरातसह नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची भर पडली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते-दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयंिसघानी यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक, दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून देईल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अ‍ॅरो या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे. तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR