21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयकॉमेडियन श्याम रंगीलाने शेवटच्या दिवशी दाखल केला अर्ज

कॉमेडियन श्याम रंगीलाने शेवटच्या दिवशी दाखल केला अर्ज

वाराणसी : प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी हा महत्त्वाचा मतदारसंघ असून , जूनमध्ये निवडणुकीचा इथे पाहायला मिळेल. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे १ जून रोजी वाराणसीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १४ मे ही शेवटची तारीख होती. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील रिंगणात आहे. त्यांनी देखील आजच्याच दिवशी अर्ज केला. तसेच लोक पक्षाचे विनयकुमार त्रिपाठी, भाजपचे सुरेंद्र नारायण सिंह, अपक्ष उमेदवार दिनेशकुमार यादव, रीना राय, नेहा जैस्वाल, अजितकुमार जैस्वाल, अशोक कुमार पांडे-अपक्ष, संदीप त्रिपाठी यांनी देखील अर्ज दाखल केले आहेत.

उत्तर प्रदेशातील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक म्हणून वाराणसीला राजकीय महत्त्व आहे. २०१९ च्या मागील लोकसभा निवडणुकीत वाराणसीमधून पंतप्रधान मोदी यांचा ऐतिहासिक विजय झाला होता. तब्बल ६७४,६६४ मते मिळवून, पंतप्रधान मोदींनी शालिनी यादव यांच्यावर विजय मिळवला. त्याच मतदारसंघातून श्याम रंगीला देखील आता रिंगणात उतरला आहे. त्यामुळे यंदाची वाराणसीची लढत ही चांगलीच रंगणार असल्याची चिन्हं आहेत.

४१ उमेदवार रिंगणात
याशिवाय अखिल भारतीय परिवार पक्षाचे हरप्रीत सिंग, अपक्ष उमेदवार नरसिंग, मूलभूत हक्क पक्षाचे संतोषकुमार शर्मा, मानवता भारत पक्षाचे हेमंतकुमार यादव, राष्ट्र उदय पक्षाचे सुरेश पाल, अपक्ष उमेदवार रामकुमार जैस्वाल, गांधीयन पीपल्सचे यशवंत कुमार गुप्ता यांचा समावेश आहे. पक्ष, नित्यानंद पांडे, अमित कुमार, जनहित किसान पार्टीचे विजय नंदन, भारतीय राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनील कुमार, अपक्ष उमेदवार श्याम सुंदर उर्फ ​​श्याम रंगीला, तुषा मित्तल, विक्रम कुमार वर्मा, पीस पार्टीचे परवेझ कादिर खान, अपक्ष योगेश कुमार शर्मा, अपक्ष उमेदवार डॉ. वंचित इंसाफ पक्षाचे वेदपाल शास्त्री आणि अपक्ष उमेदवार सुरेंद्र रेड्डी यांच्यासह एकूण २७ उमेदवारांनी आजच्या दिवशी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता वारणसीतून एकूण ४१ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR