परभणी : तालुक्यातील सिंगणापूर फाटा येथे अरिहंत कापूस जिनिंग येथे बुधवार, दि.४ डिसेंबर रोजी सीसीआय तर्फे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. डॉ. राहूल पाटील यांनी भेट देवून पाहणी केली.
परभणीत सन २०१२ पासून सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र बंद पडले होते. यामुळे शेतक-यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. शेतक-यांच्या कापसाला योग्य भाव मिळत नव्हता. आता सिंगणापूर फाटा येथे हे केंद्र सुरू झाले असून बुधवारी या ठिकाणी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी कापसासाठी ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. शेतक-यांनी या ठिकाणी कापूस विक्रीस आणावा असे यावेळी आ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंढरीनाथ घुले, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अरविंद देशमुख, संग्राम जामकर, सोपानराव अवचार, फैजूला पठाण, संजय तळणीकर, पांडुरंग खिल्लारे, जवंजाळ दाजी आदींसह कापूस उत्पादक शेतकरी, कापूस जिनिंग मधील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.