नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिल महिन्यात जनतेला मोठा दिलासा दिला. दर महिन्याप्रमाणे आज मंगळवारी १ एप्रिल रोजी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती अद्ययावत केल्या. गॅस सिलिंडरचे नवे दर आजपासून लागू झाले. मिळालेल्या माहितीनुसार १९ किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली. जवळपास ४१ रुपयांनी हा सिलिंडर स्वस्त झाला आहे. मार्चमध्ये होळीच्या आधी कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात ६ रुपयांनी वाढ केली होती तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ४१ रुपयांनी कपात केली असून, ही कपात आजपासून लागू झाली. राजधानी दिल्लीत आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत १७६२ रुपये झाली. त्याचवेळी मायानगरी मुंबईत हाच सिलिंडर १७१४.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये १९ किलोग्रॅम सिलिंडरची नवीन किंमत १८७२ रुपये झाली, जो आधी १९१३ रुपयांना विकला जात होता. चेन्नईमध्ये याच सिलिंडरची नवीन किंमत १९२४.५० रुपये झाली. त्याची जुनी किंमत १९६५.५० रुपये होती.