नवी दिल्ली : रविवार दि. १ जूनपासून देशभरात एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. यामुळे आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती सुमारे २४ रुपयांनी कमी झाल्या आहेत. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि ढाबे आदींना याचा फायदा होईल. कारण येथे हे सिलिंडर मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.
या व्यवसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने, व्यवसायासाठीचा खर्च कमी होईल. परिणामी ग्राहकांना चांगली सेवा मिळू शकेल. महत्वाचे म्हणजे, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
एप्रिल आणि मे महिन्यातील दर
खरे तर, या व्यावसायिक सिलिंडरचे दर सलग तिस-या महिन्यात कमी झाले आहेत. यापूर्वी मे महिन्यात १४.५ रुपयांनी तर एप्रिल महिन्यातही ४१ रुपये या सिलिंडरचे दर कमी करण्यात आले होते.