26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रआचारसंहिता शिथिल करण्यास आयोगाचा नकार

आचारसंहिता शिथिल करण्यास आयोगाचा नकार

दुष्काळी मदतीसाठी परवानगी आवश्यक

मुंबई : जोपर्यंत नवीन लोकसभा स्थापन होत नाही तोपर्यंत आचारसंहितेमध्ये शिथिलता दिली जाणार नाही, अशी महत्वपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. ४ जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर लोकसभा स्थापन होईल आणि त्यानंतर आचारसंहिता शिथिल केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे अत्यावश्यक निर्णय घ्यायचे असल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेणे राज्य सरकारला बंधनकारक राहणार आहे.

यामुळे दुष्काळग्रस्तांना मदत कशी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणूक निकालानंतर लगेचच आचारसंहिता शिथिल होईल, अशी चर्चा होती. परंतु निवडणूक आयोगाने देशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आचारसंहिता सुरूच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्य सरकारला दुष्काळी मदतीचा निर्णय घेताना अडचण येणार आहे. कारण निकालानंतर सरकार स्थापनेला १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR