शिमला : हिमाचल प्रदेशातील मुलींचे लग्नाचे वय २१ वर्षे करण्याबाबत राज्य सरकारने या प्रकरणाचा विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. एका निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार हिमाचल प्रदेशात मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याबाबत विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून यासंदर्भातील अधिसूचना ६ डिसेंबर रोजी जारी करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय आणि अधिकारिता सचिव एम. सुधा देवी यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
मुलींचे लग्नाचे वय २१ वर्षे करण्यासाठी सरकार कायदेशीर पर्याय शोधत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. महिलांचे लग्नाचे किमान वय १८ वरून २१ करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू आहेत. गेल्या वर्षीच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लग्नाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्यासंबंधीचे विधेयक लोकसभेत मांडले होते.