22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयमोदींविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

मोदींविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

पलनाडू : तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. आंध्र प्रदेशातील पलनाडू येथील लोकसभेची जागा असलेल्या चिलाकालुरीपेट येथील निवडणूक रॅलीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरल्याचा आरोप गोखले यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी १७ मार्च रोजी पलनाडू जिल्ह्यातील बोप्पुडी गावात एनडीएच्या निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले होते. रॅलीतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना दिसत होते. टीएमसी खासदार साकेत यांनीही आंध्र प्रदेश निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीची प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे. निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना आचारसंहितेचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता, असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR