21.5 C
Latur
Friday, August 29, 2025
Homeमनोरंजनहीरक महोत्सवी राज्य मराठी चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

हीरक महोत्सवी राज्य मराठी चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर नामांकित राज कपूर, व्ही शांताराम, जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही प्रदान केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा या सोहळ्याला उपस्थित होते.

विशेष पुरस्कार
राज कपूर विशेष योगदान पुरस्कार: अभिनेत्री काजोल
राज कपूर जीवनगौरव पुरस्कार: अभिनेते अनुपम खेर
व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार: अभिनेत्री मुक्ता बर्वे
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार: दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार: गझलकार पंडित भीमराव पांचाळे

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

*६० व्या वर्षातील पुरस्कार पुढीलप्रमाणे*

सर्वोत्कृष्ट चित्रपट – धर्मवीर

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – प्रवीण तरडे (धर्मवीर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – प्रसाद ओक (धर्मवीर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (विभागून) – अमृता खानविलकर (चंद्रमुखी)
सई ताम्हणकर (पाँडिचेरी)

उत्कृष्ट सहायक अभिनेता – योगेश सोमण (अनन्या)

उत्कृष्ट सहायक अभिनेत्री – मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – संजय नार्वेकर (टाईमपास ३)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – जयदीप कोडोलीकर (या गोष्टीला नावच नाही)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री – ऋता दुर्गुळे (अनन्या)

अंतिम फेरीतील दिग्दर्शक – ऋषी देशपांडे (समायरा)

अंतिम फेरीतील चित्रपट – समायरा

प्रथम पदार्पण दिग्दर्शक – प्रताप फळ (अनन्या)

प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती – झेनिथ फिल्म्स (आतुर)

उत्कृष्ट गीत – ढगा आड या – अभिषेक खणकर

उत्कृष्ट पार्श्वसंगीत – हनी सातमकर – चित्रपट आतुर

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – मनीष राजगिरे – भेटला विठ्ठल गीत – धर्मवीर

उत्कृष्ट गायिका (विभागून) – आर्या आंबेकर – बाई गं- चंद्रमुखी
अमिता घुगली – तुला काय सांगू कैना

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – उमेश जाधव – धर्मवीर – गीत आई जगदंबे

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – निहार शेंबेकर

उत्कृष्ट बालकलाकार (विभागून) – त्रिशा ठोसर (नाळ २) आणि कबीर खंदारे (जिप्सी)

उत्कृष्ट तृतीय क्रमांक चित्रपट दिग्दर्शक – अभिजीत देशपांडे (हर हर महादेव)

तृतीय क्रमांक चित्रपट – हर हर महादेव

द्वितीय क्रमांक दिग्दर्शक – सचिन कुंडलकर (पाँडिचेरी)

क्रमांक दोन चित्रपट – पाँडिचेरी
उत्कृष्ट तृतीय क्रमांक चित्रपट दिग्दर्शक – अभिजीत देशपांडे (हर हर महादेव)

तृतीय क्रमांक चित्रपट – हर हर महादेव

द्वितीय क्रमांक दिग्दर्शक – सचिन कुंडलकर (पाँडिचेरी)

क्रमांक दोन चित्रपट – पाँडिचेरी

*६१ व्या वर्षातील पुरस्कार पुढीलप्रमाणे*

सर्वोत्कृष्ट चित्रपट – भेरा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – श्रीकांत प्रभाकर (भेरा)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – अमेय वाघ (जग्गू आणि ज्युलिएट)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रिंकु राजगुरु (आशा)

अंतिम फेरीतील दिग्दर्शक – दीपक पाटील (आशा)

अंतिम फेरीतील चित्रपट – आशा

प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक – आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)

प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती – बोलपट निर्मिती (जिप्सी)

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – दीपक जोईल (भेरा)

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री (विभागून) – श्रद्धा खानोलकर (भेरा)

गौरी देशपांडे (श्यामची आई)

उत्कृष्ट गीत – वैभव देशमुख – गीत भिंगोरी (नाळ २)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत – अद्वैत नेमळेकर (नाळ २)

उत्कृष्ट पार्श्वगायक – मोहित चौहान (घर बंदुक बिर्यानी)

उत्कृष्ट पार्श्वगायिका* – रुचा बोंद्रे (श्यामची आई) – गीत भरजरी गं पीतांबर

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक – राहुल ठोंबरे आणि संजीव हाउलदर ( जग्गू आणि ज्युलिएट)

उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता – संतोष जुवेकर (रावरंभा)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री – आशा (उषा नाईक)

उत्कृष्ट विनोदी अभिनेता – उपेंद्र लिमये (जग्गू आणि ज्युलिएट)

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – निर्मिती सावंत (झिम्मा २)

अंतिम फेरीतील दिग्दर्शक आणि चित्रपट – सुधाकर रेड्डी यक्कंडे (नाळ २)

सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक तीन – नाळ २

उत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक दोन – महेश लिमये (जग्गू आणि ज्युलिएट)

सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक दोन – जग्गू आणि ज्युलिएट

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR