24 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeराष्ट्रीयमहाकुंभाची सांगता

महाकुंभाची सांगता

सुखोई विमानांचा ‘महा सॅल्यूट’ ४५ दिवसांत ६६ कोटी भाविकांचे पवित्र स्रान

प्रयागराज : उत्तर प्रदेशची सांस्कृतिक राजधानी प्रयागराजमध्ये ४५ दिवसांपासून पवित्र महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. आज महाशिवरात्रीच्या स्रानाने या महाकुंभाची सांगता झाली. इतर दिवसांप्रमाणे आजही कोट्यवधी भाविकांनी महाकुंभात येऊन त्रिवेणी संगमात स्रान केले. विशेष म्हणजे, आज आलेल्या भाविकांना भारतीय हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानांनी ‘महा सॅल्यूट’ दिला. सरकारी आकडेवारीनुसार, या ४५ दिवसांत सुमारे ६६ कोटी भाविकांनी त्रिवणणी संगमात पवित्र स्रान केले.

यावेळी महाकुंभात २० लाखांहून अधिक लोकांनी कल्पवास केला. हे सर्व कल्पवासी पौष पौर्णिमेच्या आधी येथे पोहोचले होते, तर सर्व नियम आणि आचरण पाळून मौनी अमावस्येपर्यंत महाकुंभात मुक्काम केला. या काळात लोकांनी आपला बराचसा वेळ भजन, कीर्तन आणि ध्यानात घालवला. मौनी अमावस्येलाच कल्पातील सर्व रहिवासी आपापल्या घरी गेले. त्यांच्यासोबतच ऋषी-मुनींचे सर्व १३ आखाडेही मौनी अमावस्येला स्रान करून निघून गेले.

महाशिवरात्रीला महाकुंभात स्रान करण्यासाठी दोन दिवस आधीच गर्दी जमू लागली होती. पहाटे साडेतीन वाजल्यापासून लोकांनी आंघोळ करण्यास सुरुवात केली. मेळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दुपारी ४ वाजेपर्यंत १.३२ कोटी भाविकांनी स्रान केले होते, तर २० लाखांहून अधिक भाविक स्रानासाठी पुढे जाताना दिसत होते. यावेळी नेहमीप्रमाणे सर्वच घाटांवर मेळा प्रशासनाने भाविकांवर पुष्पवृष्टी केली. रिपोर्टनुसार, नेपाळ, भूतान व्यतिरिक्त अमेरिका, इंग्लंड, जपानसह ५० हून अधिक देशांतील लोक महाकंभात स्रान करण्यासाठी आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR