22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक

ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक

 राजमाता माधवीराजेंचे एम्समध्ये निधन

नवी दिल्ली : ग्वाल्हेर राजघराण्याच्या राणी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती.

दिल्लीच्या एम्सशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, ‘माधवीराजे यांनी सकाळी ९.२८ वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून माधवीराजे व्हेंटिलेटरवर होत्या. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना सेप्सिससह न्यूमोनिया झाला होता. ज्योतिरादित्य सिंधिया हे गुना-शिवपुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत, जेथे ७ मे रोजी मतदान झाले होते. निवडणूक प्रचारादरम्यानही सिंधिया सातत्याने दिल्लीला भेट देत होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई राजमाता माधवी राजे सिंधिया या मूळच्या नेपाळच्या होत्या. त्या नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. त्यांचे आजोबा जुद्द समशेर बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते. १९६६ मध्ये माधवराव सिंधिया यांच्याशी माधवी राजे यांचा विवाह झाला होता.
दरम्यान, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने माधवी राजे यांना १५ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्या लाईफ सपोर्ट सिस्टीमवर (व्हेंटिलेटर) होत्या. गुना येथील निवडणूक प्रचारादरम्यान राजमाता आजारी असल्याची माहिती खुद्द ज्योतिरादित्य यांनीच दिली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR