25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयम्हैसूर विमानतळाच्या नावावरून सभागृहात गोंधळ

म्हैसूर विमानतळाच्या नावावरून सभागृहात गोंधळ

बंगळुरू : टिपू सुलतानच्या मुद्यावरून कर्नाटकात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. या मुस्लिम शासकाबद्दल वेळोवेळी वाद निर्माण होतात. दरम्यान, म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या काँग्रेस आमदार प्रसाद अब्बय्या यांच्या मागणीवरून नवा वाद सुरू झाला आहे. भाजपा आमदारांनी विधानसभेत चांगलाच गदारोळ केला.

विमानतळाचे नामकरण टिपू सुलतान करण्याच्या प्रस्ताव ठेवल्यानंतर भाजपा आमदारांनी सभागृहात उभे राहून विरोध केला. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला. यानंतरही कर्नाटक विधानसभेने केंद्र सरकारला प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर चार विमानतळांचे नाव देण्याचे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर केला आहे. यामध्ये हुबळी विमानतळाला क्रांतिवीर सांगोली रायण्णा, बेलागावी विमानतळाचे नाव कित्तूर राणी चेन्नम्मा, शिवमोग्गा विमानतळाचे नाव राष्ट्रकवी डॉ. के.व्ही. पुट्टप्पा (कुवेंपू) आणि विजयपुरा विमानतळाला जगद्ज्योती बसवेश्वरांचे नाव देण्यात येणार आहे.

सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील मंत्री एम बी पाटील यांनी स्पष्ट केले की, विमानतळांसाठी प्रस्तावित नवीन नावे केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर केली जातील. मात्र, केंद्र सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावात म्हैसूर विमानतळाचे टिपू सुलतान विमानतळमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे २०१६ मध्ये सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांनी १० नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांचा वाढदिवस टिपू जयंती म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, २०१९ मध्ये भाजपाची सत्ता आल्यावर हा उत्सव बंद झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR