18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र‘बीबीए-बीसीए’ अभ्यासक्रमांत ­पुन्­हा सीईटीचा संभ्रम

‘बीबीए-बीसीए’ अभ्यासक्रमांत ­पुन्­हा सीईटीचा संभ्रम

मुंबई : यंदा प्रथमच पदवी स्­तरावरील बीबीए, बीसीए, बीबीएम या अभ्यासक्रमांच्­या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. यापूर्वी ही सीईटी परीक्षा पार पडलेली आहे असे असताना आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने पुन्­हा एकदा सीईटी घेतली जाणार असल्­याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

महाविद्यालयांनादेखील याबाबत तोंडी माहिती असून परिपत्रकाची प्रतीक्षा लागून आहे. त्­यामुळे संभ्रमावस्­था निर्माण झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध व्­यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेच्­या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. बहुतांश सीईटी परीक्षा पार पडलेल्­या असून अनेक परीक्षांचे निकालदेखील जाहीर करण्यात आले आहे. यापैकी बीबीए, बीसीए, बीबीएम या अभ्यासक्रमाची सीईटी पार पडलेली असून निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते आहे असे असताना आणखी व्­यापक प्रमाणातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने पुन्­हा संधी दिली जाणार असल्­याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. यासंदर्भात कुठेच लेखी आदेश आढळून आला नाही.

तसेच व्­यवस्­थापनशास्­त्र महाविद्यालयांकडे चौकशी केली असता तोंडी स्वरूपात माहिती उपलब्­ध असल्­याचे सांगण्यात आले. एकंदरीत या संपूर्ण प्रकाराबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणांनी यासंदर्भात सूचना जारी करताना स्­पष्टता आणावी, अशी मागणी केली जाते आहे.

फायदा कुणाला होणार?
बारावीचा निकाल जाहीर होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. त्­यामुळे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी प्रचंड उत्­सुक आहेत. अशात बीबीए, बीसीए यांसारख्या अभ्यासक्रमांच्­या प्रवेशाला विलंब झाल्­यास विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांकडे वळण्याची शक्­यता असून अप्रत्यक्षरीत्या अशा अभ्यासक्रमांना फायदा होईल. त्­यामुळे विलंब न करता दुस-यांदा सीईटी घेतली जाणार असल्­यास, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी अपेक्षा व्­यक्­त केली जाते आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR