22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरअजिंठा लेणीत सरकारी दारुड्या कर्मचा-याचा गोंधळ

अजिंठा लेणीत सरकारी दारुड्या कर्मचा-याचा गोंधळ

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात असलेली अजिंठा लेणी भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे. या लेणीत २९ बौद्ध लेणी आहेत. इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. चौथे शतक या कालखंडात निर्मिती झालेल्या या लेणी पाहण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. यामुळे या ठिकाणावरुन देशाची प्रतिमा परदेशी पर्यटकांसमोर उंचवण्याची चांगली संधी असते. परंतु या ठिकाणी असलेले सरकारी कर्मचारी वेगळेच प्रताप करत आहेत.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात कर्मचारी मद्यप्राशन करून फिरत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भातील व्हीडीओ व्हायरल झाला असून त्यावर प्रचंड शिविगाळ कर्मचारी करत असल्याचे दिसत आहे. बौद्ध धर्माचा वारसा म्हणून अजिंठा लेणीची ओळख आहे. भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी अजिंठा लेणीमुळे ठळक ओळख होते. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोच्या यादीत आहे. २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा केली होती. त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. या लेण्यांमध्ये गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञान चित्रशिल्प रूपात आहे. यामुळे या ठिकाणी असलेले सरकारी कर्मचारी आदर्शच असायला हवे.

परंतु प्रत्यक्षात वेगळेच चित्र समोर आले आहे. अजिंठा लेणीमध्ये कार्यरत असलेले सरकारी कर्मचारी मद्याच्या नशेत आहेत. परदेशी पर्यटक फिरत असलेल्या ठिकाणी मद्यप्राशन करून काम करत असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भातील व्हीडीओ समोर आला आहे. त्यात मद्यप्राशन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करतानाचा कर्मचारी दिसत आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी भागात सरकारी कर्मचा-याचा हा प्रकार उघड झाल्यामुळे पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या कामावर प्रश्न निर्माण होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR