एनएचआरसी अध्यक्षांवरून काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली : काँग्रेसकडून विविध केंद्रीय संस्था, आयोगांच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीवरून आधीपासून आक्षेप घेतला जात आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजेच एनएचआरसीचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीवर वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

अध्यक्ष व सदस्यांच्या निवड प्रक्रियेत सुटी होत्या आणि आधीच सगळे निश्चित झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडीदरम्यान सल्लामसलत आणि सहमतीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही पक्षाने म्हटले आहे. काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी एनएचआरसीच्या अध्यक्षपदासाठी निवृत्त न्यायाधीश रोहिंटन फली नरीमन व के. एम. जोसेफ यांचे नाव सुचवले होते.

राहुल गांधी आणि खर्गेंनी आयोगाच्या सदस्यपदासाठी एस. मुरलीधर आणि अकील अब्दुल हमीद कुरैशी यांची नावे सुचवली होती. मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी दोघांनी चांगले काम केल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केला होता. दरम्यान, रामसुब्रमण्यन यांच्या नियुक्तीआधी आयोगाचे अध्यक्षपद अनेक दिवसांपासून रिक्त होते. अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ १ जून रोजीच पूर्ण झाला होता. कार्यकारी अध्यक्ष म्हणून विजय भारती सायनी यांनी कार्यभार सांभाळला होता.

काँग्रेस सूचित नावांचा विचार नाही
काँग्रेसने सुचवलेल्या नावांचा विचार झाला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. आयोगाचे म्हणून निवृत्त न्यायाधीश व्ही. रामसुब्रमण्यन यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड करताना धर्म, जात आणि भौगोलिक संतुलनाबाबत विचार झाला नाही. सरकारचा दृष्टीकोन या निवडीतून दिसतो अशी टीका काँग्रेसने केली आहे.

कोण निवड समितीत?
एनएचआरसीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या निवड प्रक्रियेच्या समितीमध्ये पंतप्रधान अध्यक्ष असतात. या समितीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष गृह मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्यसभेचे उपसभापती यांचा समावेश असतो. या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींकडून अध्यक्षांची नियुक्ती केली जाते. समितीची १८ डिसेंबरला बैठक झाली होती. राहुल गांधी आणि खर्गेही बैठकीला उपस्थित राहिले होते. पण त्यांनी सुचवलेल्या एकाही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. आयोगाच्या सदस्यपती प्रियांक कानूनगो आण विद्युत रंजन सांरगी यांची नियुक्त करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news