35.5 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेसकडून आंध्र प्रदेशात ५ उमेदवार जाहीर

काँग्रेसकडून आंध्र प्रदेशात ५ उमेदवार जाहीर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, आंध्र प्रदेशातील ५ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांचीही घोषणा केली. आंध्र प्रदेशातील कडप्पा लोकसभा मतदारसंघातून काँग्रसने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींच्या बहिणीली मैदानात उतरवले आहे. मात्र, राज्यात गत २०१९ च्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डींच्या काँग्रेसचे पारडे जड राहिले आहे. त्यामध्ये, लोकसभेच्या २२ जागा तर विधानसभेच्या १५१ जागांवर आयएसआर काँग्रेसने विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती.

काँग्रेसकडून आंध्र प्रदेशमधील ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून मुख्यमंत्र्यांच्या बहिणीलाही मैदानात उतरवले आहे. आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वायएस. शर्मिला रेड्डी यांना कडप्पा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शर्मिला या मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या बहिण आहेत. तर, माजी केंद्रीयमंत्री एम.एम. पल्लम राजू यांना काकीनाडा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. कुरुनूल येथून रामुल्लया यादव, बापटला येथून जेडी सलीम व राजामुंदरी येथून रुद्र राजू यांना तिकीट दिले आहे.

आंध्र प्रदेशात १३ मे रोजी चौथ्या टप्पात मतदान होणार आहे. येथील २५ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत असून ४ जून रोजी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यात भाजपा, जनसेवा आणि टीडीपी पक्षाने युती केली असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. येथे टीडीपी हा मोठा भाऊ असून लोकसभेच्या १७ जागा लढवणार आहे. तर, भाजपला लोकसभेच्या ६ जागा देण्यात आल्या असून जनसेना पक्षाला २ जागा मिळाल्या आहेत. यंदा प्रथमच राज्यात तीन पक्ष एकत्र आले असून आयएसआर जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसला मोठे आव्हान देण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR