35.5 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजन‘मैदान’ चा ट्रेलर झाला रिलीज

‘मैदान’ चा ट्रेलर झाला रिलीज

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता अजय देवगणचा आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यामुळे अजयसह त्याचे चाहते मोठ्या आनंदात आहेत, मात्र, अजयच्या वाढदिवशी त्याच्या आगामी ‘मैदान’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यामुळे अजयच्या चाहत्यांना आनंदाचा डब्बल डोस मिळाला आहे.

मैदान हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असून, तो अनेक वर्षापासून रखडला होता. आता लवकरच मैदान थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा १९५२ ते १९६२ दरम्यानची आहे. या चित्रपटात अजय देवगण भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत दिसत आहे.

अजय देवगणने मैदानचा ट्रेलर ट्विट करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, एक हृदय, एक समज, एक विचार, एक एस.ए. रहीम आणि त्याची टीम इंडियाच्या सत्य कथेचे तुम्ही देखील साक्षीदार व्हा, १० एप्रिलला चित्रपटगृहात या मैदानसाठी असे अजयने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. मैदानची कथा भारतीय फुटबॉल प्रशिक्षक अब्दूल रहीम आणि भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या अवतीभोवती फिरते. प्रशिक्षक म्हणून रहीम यांचा कार्यकाळ हा फुटबॉलच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता, त्यांना फुटबॉल आणि त्याचे मैदान याशिवाय दुसरे काही दिसत नाही.

मैदान हा चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त प्रियामणी आणि गजराज राव देखील दिसणार आहेत. निमार्ता बोनी कपूर यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे.तर याच दिवशी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा बडे मियाँ छोटे मियाँ हा बहुचर्चीत चित्रपटही १० एप्रिललाच रिलीज होत आहे. यामुळे दोन्ही चित्रपटापैकी बॉक्सऑफिसवर कोण बाजी मारते हे पहाने उत्सुक्तेचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR