22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयपंजाबमध्ये काँग्रेसची बल्ले-बल्ले

पंजाबमध्ये काँग्रेसची बल्ले-बल्ले

चंदीगढ : लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी (आप), काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात चुरशीची लढत आहे.

चारही पक्ष युती न करता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंजाबमध्ये १ जून रोजी सातव्या टप्प्यात मतदान झाले होते. राज्यात सुमारे ५५.५८ टक्के मतदान झाले असून, येथून ३२८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले होते, त्यापैकी १३ उमेदवारांनाच विजय मिळणार आहे.

यात मतमोजणीदरम्यान काँग्रेस पक्ष पुढे असल्याचे दिसत आहे. पंजाबमध्ये काँग्रेस ७ आणि आप आणि अपक्ष प्रत्येकी ३ जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपला राज्यात धक्का बसताना दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR