मुंबई : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटना बांधणीला सर्वप्रथम प्राधान्य देत आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता तर मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी दुपारी १.३० वा. रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष आणि पदाधिका-यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, मुझफ्फर हुसेन यांच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप व कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड गणेश पाटील यांनी दिली आहे.