22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रकॉंग्रेस नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

कॉंग्रेस नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

सातारा : महाराष्ट्रासह देशाच्या राजकारण आणि समाजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे माजी खासदार, माजी कॅबिनेटमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे आज निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भुईंज येथील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंसकार करण्यात आले. भोसले यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी रविवारी पहाटे निधन झाले.

प्रतापराव भोसले यांचे सुपुत्र माजी आमदार मदन भोसले यांनी त्यांना भडाग्नी दिला. जिल्ह्यासह राज्यातील सर्व पक्षांतील नेतेमंडळी, पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्यासह हजारोंच्या उपस्थितीत प्रतापराव भोसले यांना अखेरचा निरोप देण्यात आला. प्रतापराव भोसले यांना राजकारण, समाजकारण, कला, साहित्य, संगीत क्षेत्रात विशेष रुची होती आणि त्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींशी त्यांचे स्रेहसंबंध चांगले होते. तसेच अत्यंत सुसंस्कृत परंतु स्वाभिमानी नेतृत्व म्हणून प्रतापराव भोसले हे महाराष्ट्राला परिचित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR