मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी आपल्या वडिलांचा लोकसेवेचा, समाजसेवेचा वारसा झिशान हे नेटानं पुढे नेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला.
झीशान सिद्दीकी म्हणाले की, अनेक लोकांनी अनेक राजकीय गोष्टी केल्या. मी माझे वडील गमावले. त्यावेळीसुद्धा अनेकांनी चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं. काँग्रेस नेहमीच उबाठा गटाच्या दबावात असते. राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर विश्वास ठेवला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. या कठीण प्रसंगी ज्यांनी आमची साथ दिली मी त्यांच्यासोबत कायम राहील, असे ते म्हणाले.