धाराशिव : प्रतिनिधी
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी दि. २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आला. जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या पदाधिका-यांची घोषणाबाजी करत एसआयआरच्या माध्यमातून मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला.
जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, मागील काही वर्षांत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून आयोग सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद सार्वजनिक झाल्याने आयोगाच्या कारभारातील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने हेक्टरी एक लाख रुपयाची मदत शेतक-यांंना सरसकट द्यावी अशी मागणी करण्यात आली.
हे आंदोलन जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी राजेंद्र शेरखाने, मलंग शेख, पांडुरंग कुंभार, प्रशांत पाटील, विलास साळू, खलील सय्यद, ऍड. सय्यद इनामदार, धनंजय राऊत, ऍड. जावेद काझी, अग्निवेश शिंदे, विनोद वीर, आप्पासाहेब शेळके, दयानंद पाटील, सोमनाथ मिश्किन, सिराज मोगल, अमर तागडे, अरविंद बागडे, अर्जुन बिराजदार, पृथ्वीराज देशमुख, महबूब पटेल, अमोल कुतवळ, गोदावरी केंद्रे, मनीषा वाघमारे, मिलिंद गोवर्धन, शिवानंद तोडकर, महेश म्हेत्रे, गणेश पवार, सरफराज काझी, गोरोबा झेंडे, प्रभाकर लोंढे, संकेत पडवळ, फुरखान शेख, आबेदीन कुरेशी, नसीर इनामदार, सईद बागवान, पोपट शिंदे, मोईज सय्यद, भारत काटे, जीवन चौगुले, प्रदेश पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, सर्व तालुका कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला, विद्यार्थी, युवक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
















